महाविस्तार AI अॅप म्हणजे काय?
महाविस्तार AI हे फक्त शेतकऱ्यांसाठी तयार केलेले माहिती व मार्गदर्शन देणारे अॅप आहे.
हे अॅप कोण वापरू शकतो?
हे अॅप महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठीच उपलब्ध आहे.
शेतकऱ्यांना या अॅपमध्ये काय माहिती मिळते?
शेतकरी योजना, Farmer ID, अनुदान, पीक विमा, अर्ज प्रक्रिया व अपडेट माहिती मिळते.
Farmer ID संबंधित माहिती मिळेल का?
होय, Farmer ID कसा काढायचा, कसा डाउनलोड करायचा याची संपूर्ण माहिती मिळते.
शेतकरी योजनांची माहिती मिळते का?
होय, केंद्र व राज्य शासनाच्या सर्व शेतकरी योजनांची माहिती दिली जाते.
अनुदान योजना माहिती मिळते का?
होय, शेतकऱ्यांसाठी असलेल्या सर्व अनुदान योजनांची माहिती मिळते.
अॅपमध्ये थेट सरकारी लिंक मिळतात का?
होय, अधिकृत वेबसाइटच्या थेट लिंक दिल्या जातात.
अॅप वापरण्यासाठी इंटरनेट लागते का?
होय, अपडेट व माहिती पाहण्यासाठी इंटरनेट आवश्यक आहे.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी अॅप उपयुक्त आहे का?
होय, हे अॅप खास ग्रामीण शेतकऱ्यांचा विचार करून बनवले आहे.
मदत किंवा समस्या असल्यास काय करावे?
अॅपमधील Help / Contact पर्यायातून मदत घेता येते.